तुझें रूप किती सुंदर दिसे निळ्या ह्या अंबरी असो निरभ्र आकाश किंवा लालीमा क्षितिजा वरी कधी कृष्णसम जलद बरसे पोटी अंकुरे हिरव्या तृणी कधी पूर्णिमा शोभायमान कधी चंद्रकोर तुझ्या अंबरी कोटी कोटी रूपे तुझी वसे तुझिया अंतरी ! एकरूप होऊनी जावे वाटे माझिया मनी !! © रवींद्र गुडी